Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Update : अहमदनगर , मुंबईत आढळले दोन रुग्ण , राज्यातील एकदा १९ वर , घाबरण्याचं कारण नाही पण काळजी घेण्याचे आवाहन

Spread the love

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून आज अहमदनगर आणि मुंबईत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार झाली असून,  राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. या विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर पोहोचली आहे. दहा रुग्ण हे पुण्यातील आहेत. तर नागपुरात तीन रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत हा आकडा चारवर पोहोचला आहे. तर अहमदनगरमध्येही एक रुग्ण आढळून आला आहे . चाचणी अहवालात या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.


अहमदनगर मध्ये  दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. त्यामुळं आता राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.

दरम्यान पुण्यात आज आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १९  वर गेला आहे. तसेच पुण्यात ३११ रुग्ण देखरेखीखाली असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील कोरोना रुग्णांची माहिती दिली. पुण्यात आजही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दहावर गेला आहे. नागरीकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे असंही ते म्हणाले. पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं जाणार आहे . त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली.

दरम्यान, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चारही जिल्ह्यात एकही करोना रुग्ण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, कोल्हापूरमध्ये ४४, सांगलीत ६, साताऱ्यात ९ आणि सोलापूरमध्ये ७ जण परदेशातून जाऊन आलेले आहेत. त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून असून त्यांना १५ दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यांना घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशा लोकांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांशीही कमीत कमी संपर्क करावा. एका वेगळ्या खोलीत त्यांनी राहावं, असंही त्यांनी सांगितलं. लोकांनी कुठलीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी खात्री करावी. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले.

राज्यातील तुरुंग अधिकाऱ्यांना सूचना 

दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग पुण्यासह राज्यात वाढत असल्याने सर्व कारागृहांनी अधिकारी व कैद्यांची वैद्यकीय खबरदारी घेण्याच्या सूचना  कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिल्या आहेत. नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली असून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १८ वर गेला आहे. या दोन रुग्णांमध्ये नागपूरमध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाच्या पत्नीचा समावेश आहे.

नागपूरची परिस्थिती 

आज कोरोना लागण झालेले दोन्हीजण परदेशातून आलेले असल्याचं सांगण्यात येत आहे. करोनाची लागण झालेले हे दोघेही पती-पत्नी आहेत. नागपूरमध्ये कोरोना पहिला रुग्ण सापडला होता. त्याच्याच पत्नीला आणि सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, मेयोमध्ये करोनाच्या सहा संशयितांवर उपचार सुरू आहेत. या व्यक्तींमध्ये बाधित रुग्णाचे आई-वडील, सासू-सासरे, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन मोलकरणी, दोन मित्र, ही व्यक्ती ज्या गाडीत बसून आली त्या टॅक्सीचा चालक, प्राथमिक उपचार करणारे फॅमिली फिजिशियन आणि गार्डनर आदींचा समावेश आहे.

नागपुरात कोरोना लागण झालेल्या एका रुग्णाच्या १२ नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर दोघांचे टेस्ट रिपोर्ट संध्याकाळी येणार आहेत, असे  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. मात्र या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मेयोमधून येत असून खात्रीशीर माहिती संध्याकाळीच समजेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आतापर्यंत ७७१ लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली असून मला करोना झाला नाही. मला कोरोना झाल्याच्या अफवा उडविल्या गेल्याचंही जिल्हाधिकाऱ्याने सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!