Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतात कोरोनामुळे तीन वर्षाच्या मुलाचा बळी , इटलीत कोरोनाचा हाहाकार , ३३६ जणांचा मृत्यू

Spread the love

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ८० देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असताना, भारतातही ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमधील कोची येथे एका तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळं देशात कोविड-१९च्या रुग्णांची संख्या आता ४० वर गेली आहे. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता. ७ मार्च रोजी इटलीहून हा मुलगा आपल्या पालकांसोबत दुबईला आला, त्यानंतर कोचीला आल्यानंतर विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टनुसार तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान चीनमधून पसरणाऱ्या कोरोना व्हायरसनं आता हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. भारतातही आतापर्यंत 39 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. इटलीमध्ये एका दिवसात जवळपास १ हजार ४९२ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढू नये यासाठी सरकारनं आता २.२ कोटी मास्कची ऑर्डरही केली आहे. चीननंतर कोरोना व्हायरसचा प्रभाव सर्वाधिक असणारा देश इटली आहे. आतापर्यंत झपाट्यानं या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असून मृतांच्या आकडा १३३ वरुन ३३६ झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 7 हजार ३७५ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे इटलीतील सिनेमागृह, संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासोबतच इटलीत संक्रमण वाढू नये म्हणून वारंवार प्रशानकाडून जनजागृतीही करण्यात येत आहे.

भारतात कोरोनाव्हारच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळात पुन्हा कोरनाव्हायरससने शिरकाव केला आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९ झाली आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळात कोरोनाव्हायरसचे ५ रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी तिघं जण इटलीला गेले होते. भारतात परतल्यानंतर ते आपल्या २ नातेवाईकांच्या संपर्कात आले होते. ज्या मूळ ३ रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली ते पठ्ठणमथित्ताचे रहिवासी आहे. दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!