ताजी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट , सुरु आहे चर्चा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. आदित्य ठाकरेही त्यांच्यासमवेत आहेत.
राज शिष्टाचारानुसार मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेतात त्यानुसार त्यांचा हा दौरा आहे. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र २५ वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले आहे त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आपल्या नियोजित दौऱ्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भेट घेत असून ७ वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह ८ वाजता भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वाद घेऊन ते रात्री ९ वाजता केंद्रीय गृह मंत्री यांची अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त वृत्त वाहिन्यांनी दिले आहे.
Delhi: Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackeray as well as Minister in Maharashtra Government, Aaditya Thackeray called on PM Narendra Modi, today. pic.twitter.com/tkbBewcEpO
— ANI (@ANI) February 21, 2020