Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद शहर आणि जिल्हा परिसरात शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकाॅप्टर मधून पुष्पवृष्टी

Spread the love

औरंगाबाद – आर.आर. पाटील फाऊंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहर आणि जिल्हा परिसरात आज सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३०पर्यंत हेलीकाॅप्टरमधून पुष्प वृष्टी करणे सुरु असल्याची  माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.
देवगाव रंगारी ते खुलताबाद असा प्रवास पुष्पवृष्टी करणारे हेलीकाॅप्टर करंत आहे. शहरातील क्रांतीचौक पुतळ्याच्या जागेवर सकाळी १०वा. पुष्पवृष्टी करण्यात आली.
एकूण १३८ क्विंटल फुलांचा वापर या पुष्पवृष्टीदरम्यान होत आहे. हे विहंगम दृश्ये बघण्यासाठी शहर आणि जिल्हा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने नागरिक एकत्र येतांना दिसंत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मोत्सव कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवरायांना हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले.
जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार नुतन अध्यक्ष विनोद पाटील कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, अनिल मानकापे, मनोज पाटील, राजगौरव वानखेडे, राजु शिंदे, राजूकाका नरवडे अनिकेत पवार, मनोज पाटील, दत्ता भांगे समस्त पदाधिकारी आदींनी प्रचंड मेहनत घेऊन या अभिनव अशा ” एक राजा एक जयंती ” संकल्पनेस सुरुवात केली असुन एका आगळ्या वेगळ्या अशी महीला संरक्षण अँप चे संकल्पन करण्यात आले असुन त्याचा फायदा समस्त समाज वर्गाला होणार असुन शिवजयंती निमित्त याचे संकल्पन करण्यात आले आहे.
हेलिकॉप्टर द्वारे साधारणतः पंचाहत्तर ठिकाणी असलेल्या शहरी ग्रामीण भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पवृष्टी करण्यात आली असुन प्रचंड जोशात मशाल रॅली, ढोल पथक, लेझीम पथक, पावली पथक आदी सह मोठया प्रमाणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला असुन सकाळी 10.30 वाजता पोलीस आयुक्तांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पूजन करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी शिवगुणगान सोहळा होणार असुन एका ऑर्केस्ट्रा चे आयोजन सायंकाळी 6.30 वाजता क्रांती चौक येथे आयोजन करण्यात आले असुन शिव प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!