लज्जास्पद , धक्कादायक : अवघ्या चार महिन्याच्या छकुलीवर चुलत भावाने केला बलात्कार …

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या काही दिवसांपासून महिला आणि अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरु असून अशा घटनांची माहिती देण्यास माध्यमांना आणि वाचकांनाही लज्जास्पद भावना निर्माण होत आहे परंतु असे नीच आणि मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करणारांना कसा धडा शिकवावा हा प्रश्न कायम आहे. बऱ्याचदा नातेसंबंधांचा आणि वयाचाही विसर या विकृत आरोपींना पडत चालला आहे हे अत्यंत वेदनादायक आहे. औरंगाबाद शहरातही चिकलठाणा भागात एका वयोवृद्ध दुकानदारानाने दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करीत बलात्कार केल्याची घटना परवा घडली होती. दरम्यान महिला अत्याचाराचा कळस गाठणाऱ्या उत्तर प्रदेशात तर एका चिमुकलीवर तिच्या चुलत भावानेच बलात्कार केल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे.

Advertisements

उत्तर प्रदेशातील हरदोई शहरात अवघ्या चार  महिन्यांच्या छकुलीवर बलात्कार केल्याची  मानवतेला काळिमा फासणारी लज्जास्पद घटना घडली असल्याचे धक्कादायक वृत्त  असून उपचारादरम्यान विवेकानंद पॉलिक्लिनिक मध्ये तिचा मृत्यू झाला आहे. या चिमुरडीच्या ३० वर्षीय चुलत भावानेच तिच्यावर हा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पप्पू असे आरोपीचे नाव असून घटनेच्या दुसऱ्या दिवशी हा नराधम पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याच्यावर अपहरण , बलात्कार आणि बालहत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , हरदोई शहराच्या मंदिओन पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका लग्न सोहळ्यासाठी पीडित कुटुंबीय त्यांच्या चिमुरडीला घेऊन आले होते. पीडितेच्या महिलेल्याच्या काडीवरील पीडित चिमुरडीला खेळवण्याच्या बहाण्याने आरोपीने काकूंच्या हातून जवळ घेतले आणि तो निघून गेला. दरम्यान दोन तास उलटून गेले तरी आरोपी बाळाला घेऊन परतला नाही तेंव्हा काळजी वाटल्याने तिच्या आई -बाबांनी आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली तेंव्हा लग्न स्थळापासून जवळच  लॉनवर पडलेली चिमुरडी सापडली तेंव्हा आरोपीही तिच्या जवळच होता अखेर आपल्या काका -काकूला आणि नातेवाईकांना पाहून तो पळून गेला. तिच्या आईने तिला उचलले तेंव्हा चिमुरडी अत्यावस्थ होती. तिला तातडीने विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु ती वाचू शकली नाही.दरम्यान चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी चिमुरडीच्या पित्याने पोलिसात तक्रार दाखल केली. रविवारी घटना घडल्यानंतर  फरार झालेल्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस उपयुक्त सर्वक्षेष्ठ त्रिपाठी यांनी सांगितले कि , आरोपी पप्पूविरुद्ध अपहरण , बलात्कार आणि बालहत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार