दारू का पिता ? अशी विचारणा करणाऱ्या पित्याने मुलीला पेटविले , चेहरा भाजला

Advertisements
Advertisements
Spread the love

सतत दारू पिणाऱ्या आपल्या वडिलांना , तुम्ही रोज दारू का पिता ? असे विचारणाऱ्या मुलीच्या डोक्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणारा बाप पोलिसात तक्रार होताच पसार झाला  असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या आठवड्यात लातूरमधील एमआयडीसी रुग्णालयात मुलगी पेटल्याची घटना नोंदविण्यात आली होती. त्यावेळी दूध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने विद्यार्थिनीचा चेहरा भाजल्य़ाचे सांगितले होते.

Advertisements

याबाबत पोलीस अधीक्षकांनी स्वतः हि माहिती दिली होती. परंतु या प्रकरणाचे सत्य जे बाहेर आले ते पाहून अनेकांना धक्का बसला.  प्रारंभी सांगण्यात आले कि , दीपज्योती नगरमधील दहावीत शिकणारी मुलगी घरात दूध तापविताना अचानक स्टोव्हचा भडका होऊन तिचा चेहरा भाजला. घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हते. पहिल्यांदा लहान भावाने बहीण भाजल्याचे बघितल्यानंतर आरडाओराडा करुन शेजाऱ्यांना बोलवले. त्यांनी मुलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर शनिवारी पीडित मुलीने आपला जबाब पुन्हा दिला. त्यात  तिने म्हटले आहे की, ६ फेब्रुवारी रोजी घरात मी एकटी होते. त्यावेळी वडील दारू पिऊन घरी आले. मी त्यांना तुम्ही रोज का दारू पिता असं विचारला असता ते रागावले व त्यांनी मुलीला मारहाण केली. वडिलांनी बेल्ट काढून तिला मारले. मुलीनी आईला सांगते असं म्हटल्यावर तुला आणि तुझ्या आईला जाळतो असं म्हणत घरातील रॉकेलची बाटली घेऊन मुलीच्या डोक्यावर टाकली आणि केस पेटविले. आरडाओरडा केल्यानंतर वडील तेथून पळाल्याचे पीडित मुलीने सांगितले. वडिलांनी याबाबत धमकी दिल्याने मी तक्रार दाखल केली नसल्याचे पीडितेने सांगितले. तिच्या या जबाबानुसार पोलिसांनी पीडितेच्या वडिलांविरोधात कलम ३०७ नुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

आपलं सरकार