Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेळ बदलून मोदींनी केली मन कि बात …

Spread the love

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन कि बात मधून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले कि ,  प्रजासत्ताक दिनामुळे आपल्याला मन की बात कार्यक्रमाची वेळ बदलावी लागली. दिवस बदलतात. वेळ बदलते, वर्ष बदलते, परंतु, भारतीय लोकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी आम्ही अनेक संकल्प केले. सिंगल यूज प्लास्टिक, मुली शिकवा, मुली वाचवा अभियान राबवले. जल संरक्षणासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. यात प्रत्येक समाजातील व्यक्तींनी योगदान दिले. उत्तराखंडच्या इल्मोडा मध्ये एक किलोमीटर पर्यंत पाइप लाइन टाकून दोन दशकापूर्वीची समस्या मिटवण्यात आली. देशभरात अशा असंख्य कथा आहेत. जल संरक्षण केले जाणारे कार्य शेअर करा, असे आवाहन मोदी यांनी केले.

देशातील आंदोलनावर अप्रत्यक्ष भाष्य करताना मोदी म्हणाले कि , हिंसा केल्याने कोणत्याही समस्याचे निराकरण होऊ शकत नाही. कोणत्याही कारणांशिवाय शस्त्र हाती घेणाऱ्या लोकांसोबत चर्चा करून शांततेने तोडगा काढला जाऊ शकतो, असा सल्ला आजच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन ‘मन की बात’ केली. विद्यार्थ्यांनो लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत. देशाच्या तरुणांचा आत्मविश्वास वाढला आहे. एकीकडे परीक्षा सुरू होणार आहेत तर दुसरीकडे थंडी पसरलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा असा मोलाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. सध्या फिट इंडियासाठी खूप प्रयत्न होताना दिसत आहेत. फिट इंडिया स्कूल मोहिमेला जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. ६५ हजार शाळांनी अर्ज करून प्रमाणपत्र मिळवल्याची माहितीही मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना दिली.

मोदी पुढे म्हणाले कि , आसामच्या जनतेला खेलो इंडियासाठी शुभेच्छा देतो. खेलो इंडियात ६ हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. यात ८० विक्रम मोडले. विशेष म्हणजे यात मुलीचे नाव अग्रभागी होते. खेलो इंडियामुळे तीन वर्षात खेळाडूंची संख्या दुप्पट झाली आहे. खेळाडूंची कथा अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. तामिळनाडूचे योगानाथन बीडी बनवण्याचे काम करतात. परंतु, त्यांच्या मुलीने सुवर्ण पदक जिंकले. डेविड बॅकहमने सायकलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले. या आधी मी अंदमानला गेलो होतो. डेविडचे आई-वडील लहानपणीच वारले. त्याच्या काकाने त्याचा सांभाळ केला. फुटबॉलरचे नाव त्याचे ठेवले. परंतु, त्याने सायकलिंगमध्ये नाव कमावले. मित्रांनो …लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत. देशातील तरुणांचा आत्मविश्वास वाढला आहे. एका बाजुला परीक्षा तर दुसऱ्या बाजुला थंडी आहे. त्यामुळे आता व्यायाम करणे गरजेचे आहे. सध्या फिट इंडियासाठी खूप प्रयत्न होताना दिसत आहेत. फिट इंडिया स्कूलची मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. २०२२ मध्ये प्रजासत्ताक दिनाला ७५ वर्ष पूर्ण होतील, त्यामुळे अंतराळात जाण्याच संकल्प पूर्ण करायचा आहे. या मिशनसाठी अंतराळात जाण्यासाठी ४ तरुणांची निवड करण्यात आली आहे. ही चारही तरूण वायुदलाची पायलट आहेत. ते प्रशिक्षणासाठी रशियाला जाणार आहेत, असे मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!