राष्ट्रीयत्वाचा पुरावा मागितल्यास ” असे ” उत्तर देण्याचा अकबरुद्दीन ओवेसी यांचा मुस्लिमांना सल्ला…

Advertisements
Advertisements
Spread the love

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसे यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधील एका सभेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना अकबरुद्दीन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जे लोक कागदपत्रं पाहण्यासाठी घरी येतील, त्यांना सांगा की आम्ही या देशात ८०० वर्षे राज्य केले आहे. ही चारमीनार माझ्या वाडवडिलांनी बनवली आहे, तुझ्या बापाने नाही, असे वक्तव्य अकबरुद्दीन यांनी केले आहे.

Advertisements

आपल्या भाषणात अकबरुद्दीन म्हणाले की, ‘कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. ते काय बोलतात ते मान्य करण्याचीही आपल्याला गरज नाही. मुसलमानांकडे काय आहे, असे जे लोक विचारतात, त्यांना मी सांगतो की तू माझे कागदपत्रं तपासू इच्छितो. मी ८०० वर्षांपर्यंत या देशात राज्य केले आहे, शौर्य गाजवले आहे. हा देश माझा होता, माझा आहे आणि माझा राहील. माझे वडील आणि माझ्या आजोबांनी या देशाला चारमीनार दिली, कुतुबमीनार दिली, जामा मशीद दिली. या देशाचा पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतो, तो लाल किल्ला देखील आमच्याच पूर्वजांनी दिला आहे.’

Advertisements
Advertisements

आपलं सरकार