Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : बाळ “काँग्रेस ” जैन च्या नामकरणाचा हि आहे कथा…

Spread the love

सध्या बाळ “काँग्रेस ” ची बातमी सोशल मिडीयावरील व्हायरल झाली आहे. या बातमीची सर्वत्र चर्चा आहे. शेक्सपियरने नावात काय आहे असे म्हटले असले तरी नेहमीच सर्व काही नावातच आहे याची प्रचिती आल्याने नावाच्या बातम्यांना नेहमीच महत्व आहे . अशीच हि बातमी आहे . बातमीनुसार एका बापाने आपल्या बाळाचं जे नाव ठेवले आहे तो देशभर बातमीचा विषय झालं आहे. राजस्थानमधील विनोद जैन यांनी केलेल्या आपल्या बाळाच्या नामकरणाची हि बातमी आहे. कारण त्यांनी आपल्या मुलाला चक्क एका राजकीय पक्षाचं नाव ठेवलं आहे,.

विनोद जैन राजस्थानच्या मुख्यंमंत्र्यांच्या कारभारावर प्रचंड खूश असून . या आनंदाच्या भरात त्यांनी आपल्या मुलाचं नाव मुख्यमंत्री ज्या पक्षातले आहेत त्या ” कॉंग्रेस”  पक्षाचं दिल आहे. विनोद जैन हे स्वत: मुख्यमंत्री कार्यालयात मीडिया अधिकारी पदावर काम करतात. मंगळवारी त्यांच्या मुलाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. मात्र यावेळी बाळाच्या नामकरण सोहळ्याला आलेले सर्वजण बाळाचं नाव ऐकून आचंबित झाले. सर्वांना अनपेक्षित असं हे नाव असल्यानं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आणि एकच चर्चा सुरू झाली.

आपल्या बाळाचे “कॉंग्रेस” असं नाव ठेवणारे  राजस्थान राज्यातील उदयपूर येथील  विनोद जैन  यांचे असे म्हणणे  आहे की, त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची कॉंग्रेस पक्षावर खूप निष्ठा आहे. आमचं पुर्ण कुटुंब कॉंग्रेस पक्षाशी जोडलं गेलंय त्यामुळे आमची पुढची पिढी देखील भविष्यात पक्षाशी एकनिष्ठ रहावी यासाठी मी थेट माझ्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्याने जैन प्रभावित आहेत. ते म्हणाले की, जेव्हा माझा मुलगा १८ वर्षांचा होईल तेव्हा त्याचं राजकीय करिअर सुरू होइल. मुलगा मोठा होऊन पक्षात मोठी जबाबदारी पार पाडेल अशी आशा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!