Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“भाजके शिवाजी – नरेंद्र मोदी ” पुस्तकावरून सकल मराठा समाज अधिक आक्रमक , महाराष्ट्राची माती कलंकित करण्याचा प्रकार

Spread the love

दिल्लीतील एका भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून वाद सुरू आहे. या पुस्तकावर सगळ्यांनीच टीका केली असून, पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. हे वादाचं हे लोण आता ठाण्यात देखील सुरू झाले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मुद्दा उचलण्यात असून यामुळे वातारण चांगलेच तापलं आहे.

महाराष्ट्रात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकावरून सध्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील या पुस्तकाच्या विरोधात दंड थोपटले आहेत . हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असे झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच या  नेत्यांनी दिला आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात मराठा समाजाच्या वतीने हा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे  या पुस्तकावरून येत्या काही काळात ठाण्यात देखील  वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने पत्र देण्यात आले असून या पत्रामध्ये त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्या सोबत करणे म्हणजे हा केवळ अपराधच नव्हे तर, महाराष्टाची माती कलंकित करण्यासारखे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!