सीएए वरून देशातील तरुण अफवांचे बळी ठरत आहेत म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत . या दौऱ्यात ते नवीन बहुचर्चित कायद्याविषयी बोलत आहेत . या कायद्यावरून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहे.  या दौऱ्या दरम्यान कोलकातातील बेलूर मठ येथे या कायद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले कि , नागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे,  हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Advertisements

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक होऊनही त्यांनी विरोधी भूमिका घेतल्याबद्दल त्यांच्यासह विरोधी पक्षांवर टीका केली. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, हिसकावून घेणारा नाही. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जाणूनबुजून समजावून घेत नाही. हा कायदा लागू झाल्यानंतर अल्पसंख्याकांवर अत्याचार का केले, याचं उत्तर पाकिस्तानला द्यावं लागेल, असं मोदी म्हणाले.

Advertisements
Advertisements

सध्या देशभर ‘नागरिकत्व सुधारणा  कायद्याबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या आहेत. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरूणांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे,’ असंही मोदी म्हणाले. ‘दुसऱ्या देशातला कुणीही नागरिकत्व घेऊ शकतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, हिसकावून घेणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा केवळ सध्याच्या कायद्यात केलेली दुरुस्ती आहे. फाळणीमुळं ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे असं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासहित अनेक दिग्गज नेत्यांना वाटत होतं,’ असंही मोदींनी सांगितलं. जे गांधीजींनी सांगितलं त्याचं पालन आम्ही केलं. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती ज्यांचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे, ते प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवू शकते, असं मोदी म्हणाले.

आपलं सरकार