अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसांनाच भरधाव वाहनाने चिरडले , एक ठार एक जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांना नागपूर-जबलपूर महामार्गवर अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मरारवाडी गावाजवळ रविवारी सकाळी हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि , महामार्गावर बोलेरो आणि कारमध्ये भीषण अपघात झाला होता. यावेळी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हे अपघातग्रस्त वाहतूक पोलीस रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवर मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी हॉस्पिटसमध्ये हलवण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Advertisements

आपलं सरकार