Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नव्या वर्षात नव्या उद्योगाचा परवाना आता मिळेल फक्त पाच दिवसात

Spread the love

मोदी सरकारने नवीन उद्योग व्यवसाय सुरु करताना नव्या नियमानुसार केवळ ५ दिवस वेळ लागणार आहे. त्यामुळे  नव्या आर्थिक वर्षात १८ दिवसांच्या ऐवजी ५ दिवसांत परवान्यांचे काम होणार आहे. विशेष म्हणजे नावाची नोंदणी आणि जीएसटीसाठी नोंदणी यासाठी  केवळ दोन फॉर्म तयार करण्यात आले आहेत. प्रचलित नियमांनुसार सध्या यासाठी बरेच फॉर्म भरावे लागतात. या महिन्यातच कॉर्पोरेट मंत्रालय हे दोन फॉर्म जारी करणार आहे. Spice Plus आणि Agile Pro अशी या फॉर्मची नावं आहेत. यामध्ये सगळी माहिती भरायची आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाइम्सला  दिलेल्या माहितीनुसार, हे नवे फॉर्म वेबवर आधारित असतील आणि पहिल्यापेक्षा सोपेही असतील. Spice Plus फॉर्मच्या मदतीने तुम्ही तुमचं नाव आणि इनकॉर्पोरेशनबद्दल माहिती देऊ शकाल. एन्प्लॉयी स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC)आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यासोबतच इनकॉर्पोरेशनच्या वेळी नोंदणी करावी लागेल. डायरेक्ट आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) आणि प्रोफेशनल टॅक्ससाठी नोंदणीसोबत पॅन, टॅक्स सवलत या सगळ्याची नोंदणी करणं सोपं होईल. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात नवा व्यवसाय  सुरू करायचा असेल तर १८ फॉर्म भरावे लागतात, असे  वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!