Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सावधान !! तुमच्या घरातील सोन्यावर नजर ठेवण्यासाठी मोदी सरकारने आणलीय “गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ” , बँकांना दिले सोने गोळा करण्याचे टार्गेट

Spread the love

लोकांच्या खिशातील नोटांचा हिशेब ठेवणाऱ्या मोदी सरकारनं  आता कोणाच्या घरात किती सोने आहे याचाही हिशेब ठेवण्याचे मनसुबे रचले आहेत . त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांची मदत घेऊन बँकात सोने ठेवा आणि त्यावर व्याज घ्या अशी योजना सुरु केली आहे. सीएनबीसी आवाजने यासंदर्भात दिलेल्या बातमीनुसार, अर्थ मंत्रालयाकडून  बँकांना दर तिमाहीसाठी तसे उद्दिष्टही देण्यात आलं आहे. “गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ” असे या मोहिमेचे नाव असून या मोहिमेंतर्गत  ग्राहकांचं सोनं बँकेत जमा करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या वृत्तानुसार सदर योजनेंतर्गत  भारतीय स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ३.५  टन सोनं जमा केलं आहे. तर आयसीआयसीआय बँकेने ४१ किलो सोनं जमा केलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षासाठी बँक ऑफ बरोडाला  २०० किलो सोन्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे.

मोदी सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेल्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये रिझर्व बँकेने बदल केले आहेत. काही नवी नियम यामध्ये आणण्यात आले आहेत. योजनेनुसार जे  ग्राहक थेट बँकेत किंवा कलेक्शन अँड प्युरिटी टेस्टिंग सेंटरमध्ये  आपलं सोनं जमा करू इच्छितात. बँक त्याबदल्यात ग्राहकांना पैसे किंवा स्कीम देऊ करेल. सोन्याची शुद्धता तपासूनच ग्राहकांना त्याचा मोबदला देण्यात येईल. म्हणजेच बँका तुमच्या सोन्याच्या बदल्यात मोबदला किंवा त्यावर व्याज देऊ करेल. स्टेट बँकेने काही महिन्यांपूर्वी सोन्याची एक योजनाही आणली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  या गोल्ड डिपाॅझिट स्कीम (R-GDS )वर चांगलं व्याज मिळतंच, शिवाय इतर फायदेही आहेत.स्टेट बँक सोन्याच्या शुद्धतेच्या आधारे तुम्हाला सोन्याचं प्रमाणपत्र देते. तुमचा फिक्स्ड डिपाॅझिटचा काळ संपला की मग ३,४,५ किंवा 6 वर्षांनी त्या सोन्यावर सोन्याच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात व्याजासहित त्या वेळेच्या दराप्रमाणे पैसे घेऊ शकता.

या योजनेच्या जाळ्यात ग्राहकांना ओढण्यासाठी बँकांकडून सांगण्यात येते कि , तुम्ही घरी ठेवलेल्या सोन्याला या स्कीममध्ये लावू शकता. म्हणजे चोरीचं टेन्शन राहणार नाही आणि सोन्यावर व्याजही मिळेल. स्टेट बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार भारतात राहणारी कुणीही व्यक्ती ही स्कीम घेऊ शकतो. सिंगल आणि जाॅइंट अकाउंटही उघडू शकतात. एचयुएफ, पार्टनरशिप फर्मही यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये कमीत कमी ३० ग्रॅम सोनं गुंतवावं लागतं. जास्तीत जास्त कितीही गुंतवू शकता. मात्र मुदतीपूर्वी एक वर्षाआधी पैसे काढले तर व्याज दरावर दंड पडेल. मीडियम टर्मची गुंतवणूक 3 वर्षांची असते तर लाँग टर्मची गुंतवणूक 5 वर्षांची असते. त्याआधी पैसे काढले तर दंड पडतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!