Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चोरीच्या घटनांनी वर्ष गाजले, बलात्कार, दुखापत, जबरी चोरीच्या घटनांमध्येही वाढ, गुन्ह्याचा तपस करणारांचे कौतुक

Spread the love

शहरातील विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने वर्षभरात घडलेल्या घटनांचा सोमवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पाढा वाचला. वर्षभरात चोरांनी शहरात कहर केला आहे. घरफोड्या, तोतया पोलिस, वाहन चोरी, मोबाईल चोरी तसेच अन्य किरकोळ चो-यांमुळे पोलिस हैराण झाले आहेत. तरी देखील पोलिस अधिका-यांच्या कारवाईवर आयुक्त प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस ठाण्यांची कारवाई यंदा सरस राहिली. बंदोबस्त पार पाडत पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांचे आयुक्तांनी तोंडभरुन कौतुक केले.

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशाने नऊ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. वाळुजमधील मृत कमलेश पानिक आणि बेगमपुरा येथील मृत शफिक खान यांच्या गुन्ह्यांमध्ये कुठलाही धागादोरा नसताना दोन्ही गुन्हे स्थानिक पोलिसांनी उघडकीस आणले. वाळुज पोलिसांनी चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस आणले. पुंडलिकनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच गावठी पिस्टल, ४८ किलो गांजा, बनावट नोटांचे स्कँडल उघडकीस आणले. आॅनलाईन पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये संशयीत महिलेला अटक करुन तब्बल ३२ लाख रुपये सायबर क्राईमने कॅनरा बँकेला परत मिळवून दिले. तर ७९ लाख रुपये असलेले खाते गोठविण्यात आले. आॅनलाईन फसवणूकीच्या आणखी एका प्रकरणात संशयीत आरोपी धनेश्वर पोतदार व पिंकु यादव यांना अटक करुन आॅनलाईन हडप केलेली ४५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली. पुंडलिकनगर पोलिसांनी दोन खुनाचे गूढ उकलले. सिडको पोलिसांनी वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद केली. मंगळसूत्र चोरांना देखील सिडको पोलिसांनी जेरबंद केले. मात्र, तोतया पोलिसांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातून ८३६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यापैकी केवळ दोनशे वाहने हस्तगत करण्यात पोलिस आयुक्तालयाला यश आले आहे. तर एकुण एक हजार ३७३ चो-यांपैकी केवळ ३४९ चो-या उघडकीस आल्या आहेत. १५६ घरफोड्यांपैकी केवळ ४७ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिस ठाणे प्रभारींना यश आले आहे. जबरी चोरीच्या १४९ घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ ८९ घटना उघड झाल्या आहेत. तर ४६ महिलांचे सौभाग्याचे लेणे चोरांनी हिसकावून नेले. त्यापैकी केवळ १३ महिलांचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून, त्यात ब-यापैकी सातारा, सिडको पोलिसांना यश मिळाले आहे.


शहराच्या गुन्हेगारीत वाढ……
शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, वर्षभरात २६५ गुन्हे वाढले आहेत. असे असले तरीही घरफोडी, मारामारी, सरकारी कामातील अडथळ््यांच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र ही वाढ प्रत्येक गुन्हा नोंदविल्याने झाल्याचा दावा पोलिस आयुक्त करायला विसरले नाही.


गुन्हे घटले……
खुनाचा प्रयत्न करणे या स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्याने घट झाली आहे. घरफोडीचे गुन्ह्यांमध्ये सात टक्क्याने घट झाली. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३५ गुन्ह्यांनी घट झाली आहे. तर महिला अत्याचाराच्या घटनेत ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.


गुन्हे वाढले….
अवैध धंद्यांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. जुगार कायद्यानुसार कारवाया वाढल्याने २६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर मोटार वाहन कायद्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत २०२ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रमाण वाढवल्याने १ हजार ४५२ केसेस मध्ये वाढ झाली आहे.


आर्थिक गुन्हे शाखेचा विसर…..
पांढरपेशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या शाखेच्या वतीने वर्षभरात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६५ किलो सोने लंपास केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने व्यवस्थापकासह कपडा व्यापा-याला अटक केली. याशिवाय अनेक मोठे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले. पण आज झालेल्या पत्रकार परिषदेत आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईचा मात्र पोलीस आयुक्तांनी उल्लेख केला नाही.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!