Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak Helpline : सोने खरेदी करताना हि खबरदारी जरूर घ्या…

Spread the love

लग्न सराईच्या दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या मागणीमुळे आठवडाभरात ५०  रुपयाने  सोन्याचे भाव वाढले असले तरी बऱ्याच प्रमाणात स्थिर असल्याचे चित्र आहे. भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दारांवर नियंत्रण आले असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय  सराफा बाजारात आज सोन्याचे भाव १०० रुपयांनी वाढले आहेत.  दरम्यान चांदीच्या किंमतींमध्ये  मात्र तुलनेने थोडी वाढ झाली आहे. चांदीचे भाव  मात्र आठवडाभराच्या तुलनेने कमी झालेले आहेत . आजचा चांदीचा भाव ४६,८५० रुपये प्रतिकिलोने आहे. तर सोन्याचे आजचे दर २२ कॅरेटसाठी ३७ हजार १५० रुपये तर  २४ कॅरेटसाठी ३८ हजार १५० प्रतितोळा असे  आहेत.

दरम्यान देशातील सर्व प्रमुख शहरातील बाजारपेठेत थोड्या फार फरकाने हे दर वेगवेगळे आहेत त्याचे कारण तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात असे सांगितले जाते.

दरम्यान ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घेणे तसेच  सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चे  बिल न घेता पक्के बिल घेणे हिताचे ठरते. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत. सोने खरेदी करताना आणखी  एक महत्वाची गोष्ट म्हणजे  सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेलय सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहण्याचा तुम्हाला हक्क आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!