CAB : नागरिकत्व सुधारणा  विधेयकावर सोनिया गांधी यांची टीका , म्हणाल्या काळा दिवस आणि संकुचित विचारांचा विजय

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही  नागरिकत्व सुधारणा  विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  याबद्दल आपले मत मांडताना त्यांनी म्हटले आहे कि , ” आज भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस पाहण्यास मिळाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मिळालेली मंजुरी म्हणजे संकुचित  मनोवृत्तीच्या आणि धर्मांध शक्तीच्या लोकांचा विजय आहे”  एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

Advertisements

सोनिया गांधी म्हणाल्या, आज भारताच्या संविधानातील इतिहासात काळा दिवस आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर होणे म्हणजे भारताच्या बहुसंख्यांकवादावर संकुचित मानसिकता आणि कट्टरतावादी शक्तींचा विजय झाल्यासारखे आहे. आपले पूर्वज आयडिया ऑफ इंडियाच्या ज्या आदर्शला घेऊन लढले होते. हे विधेयक याच्या विरोधात आहे. हे विधेयक अशा विकृत आणि फाळणी करणाऱ्या भारताच्या निर्माणाचा प्रयत्न करते आहे. या ठिकाणी धर्मच राष्ट्रीयतेला निर्धारित करणार आहे. काँग्रेसने या विधेयकाला विरोध करण्यासाठी लोकसभेत आणि राज्यसभेत जोरदार प्रयत्न केले. हे विधेयक म्हणजे असंविधानिक असून धर्माच्या आधारावर फाळणी करणार असल्याचे म्हटले. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात १०५ मते पडली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार