आई बापाच्या फोनमध्ये दंग झाली आणि मुलाचा करूण अंत झाला ….

Advertisements
Advertisements
Spread the love

एकीकडे आई बापाच्या फोनमध्ये दंग  झाली आणि दुसरीकडे एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाथरुममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात अाकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगर समोरील डीजीपीनगर येथे रविवारी ही घटना घडली.  अबिद मोहित शेख (वय १ वर्षे) याची मावशी डीजीपीनगर संतोषीमाता नगर येथील साईर कुटीर सोसायटीत राहते. तिची नुकतीच प्रसुती झाली. तिची बहीण फुलमती खातून ही आपला लहान मुलगा अबिदला घेऊन बहिणीच्या घरी गेली होती.

Advertisements
Advertisements

बहिणीकडे या  कुटुंबीयांनी रविवारी रात्री जेवण घेतले त्यावेळी फुलमती अबिदला जेऊ घालत असताना अचानक तिला तिच्या पतीचा फोन आला त्यामुळे ती फोनवर बोलत बोलत  बाल्कनीत गेली. आईचे दुर्लक्ष झाल्याने एक वर्षीय ब्लॅक अबिद हा रांगत रांगत बाथरुममध्ये गेला. तेथे पाण्याने भरलेला टब होता. त्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला. हे लक्षात येताच अबिदच्या मृत्यूमुळे आईने एकच आक्रोश केला. पण तेंव्हा वेळ निघून गेलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घडलेल्या घटनेनंतर शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

आपलं सरकार