Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हैद्राबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण : सलमान खान आणि सुबोध भावेने व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया…

Spread the love

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.  या घटनेनंतर अभिनेता सलमान खाननंही ट्वीट करून संताप व्यक्त केला. पीडितेला न्याय मिळावा म्हणून आता कलाकारही पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावरून अभिनेता सुबोध भावेनं आपला संताप व्यक्त केला. तर, सलमान खाननं अन्यायाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.


“प्रियांका रेड्डीला न्याय मिळायला हवा. ज्यांनी हे कृत्य केलं ती माणसं नसून सैतान आहेत. यांच्याविरोधात लढायला आपण एकत्र यायला हवं. बेटी बचाओ हे फक्त कॅम्पेन पुरतं मर्यादित राहू नये. हीच वेळ आहे या अन्यायाविरोधात उभं राहण्याची.” अशी भावना सलमान खानने व्यक्त केली.


दरम्यान सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सर्वसामान्यांसह कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेता सुबोध भावे याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ‘जो देश स्त्रियांचा सन्मान ठेवू शकत नाही तो स्वतःचं सत्व गमावतो.’ असं ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1200633171404038144


‘ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय, तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा केली पाहिजे. जो देश स्त्रियांचा सन्मान ठेवू शकत नाही तो स्वतःचं सत्व गमावतो.’ असं ट्विट सुबोधनं केलं आहे.


सुबोध प्रमाणेच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या घटनेविषयी आवाज उठवला आहे. विजय देवरकोंडा, अनुष्का शेट्टी, फरहान अख्तर, अक्षय कुमार यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!