महाराष्ट्राचे सत्ताकारण : महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे ?

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील सत्ता स्थापनेची  जय्यत तयारी चालू असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत. त्याआधी महत्त्वाच्या पदांवर चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं अध्यक्षपद मिळू शकतं. त्याचबरोबर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे. याबाबत खा. संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले कि याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार घेतील.

Advertisements

महा विकास आघाडीच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेटसाठीचा फॉर्म्युला ठरविण्यात येत आहे. यामध्ये  १५-१३-१३ या फॉर्मु्ल्यावर बनू शकते. यामध्ये शिवसेनेकडे १५, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १३ आणि काँग्रेसला १३ मंत्रिपदं मिळू शकतात अशी चर्चा आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी उपमुख्यमंत्रिपदाच्या ऐवजी विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली, अशी माहिती आहे. आता यावर तिन्ही पक्ष निर्णय घेतील. पण सध्या तरी नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही. उद्याच्या शपथविधीआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल, शरद पवार आणि उद्धव ठाकरेच आता यावर निर्णय घेतील.

याआधी काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांची नावं उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होती. त्यानंतर काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याची बातमी आली. त्यामुळे सोनिया गांधींनी मागणी केल्यानुसार काँग्रेस फक्त विधानसभा अध्यक्षपद घेतं की उपमुख्यमंत्रिपदावरही यावर चर्चा केली जात आहे. आता मुंबईतल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर याबद्दलचा निर्णय होऊ शकेल.

आपलं सरकार