Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देतील ?

Spread the love

कालपासून हि बातमी अधिक चर्चेत आहे कि , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. अर्थात तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारण उद्या म्हणजेच ८ नोव्हेंबरला १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा राजीनामा अपेक्षित आहेत. उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे आता प्रश्न असा आहे कि , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देतील कि , आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ?  कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना १८२ आमदारांचे समर्थन असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान हि सुद्धा चर्चा आहे कि , चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री पंढरपुरात बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याने पत्रकार चांगलेच गोंधळात पडले आहेत. कि , चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या बाबतीत असे घुमजाव का केले ? असो …

आज ८  नोव्हेंबरला १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणे गरजेचे आहे . पण राज्यात अद्याप सत्ता स्थापन करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, चर्चा शीही आहे कि , मुख्यमंत्री हे थेट राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सोपवतील . जर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग येईल.

राज्यात सध्या सत्तेवरून कठीण पेच निर्माण झाला आहे. त्यावर राजकीय सल्ला घेण्याचं काम सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देण्याची गरज नसते. ८ तारीख संपेपर्यंत मुख्यमंत्री हे त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो.

दरम्यान, उद्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांनाच  काळजीपाहू मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. पण यातून देवेंद्र फडणवीस कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे उद्या जर सरकार स्थापन झाले नाही तर सर्वांचे लक्ष राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे असणार आहे.

आपलं सरकार