Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Delhi News Update : शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपनेत्यांची तीव्र नाराजी, मुख्यमंत्रीपद तर नाहीच पण महत्वाची खातीही मिळणार नाहीत , देवेंद्र फडणवीस यांना ” प्रतीक्षा करो और देखो ” चा सल्ला !!

Spread the love

भाजपचे अभिमन्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत शिवसेनेने निर्माण केलेले चक्रव्यूव्ह भेदण्याची रणनीती समजून घेण्यासाठी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन प्रत्यक्ष हाल -हवाल सांगितला . शहा यांनी तो शांतपणे  ऐकून घेतला आणि ” देखते है !!” म्हणत ८ तारखेपर्यंत शांत राहण्याचा सल्ला दिला. या शांततेच्या मागे आता शहा आणि मोदी जो काय निर्णय घयायचा घेतील पण यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या ४०-४५ मिनिटांच्या भेटीत काय झाले ? त्याचे तपशील माध्यमांपर्यंत पोहोचत आहेत.

दिल्लीतील माध्यम प्रतिनिधींच्या सूत्रानुसार भाजप नेत्यांचे  असे मानणे आहे कि ,  राज्याच्या निवडणूकीत भाजप -सेना महायुतीला जन्मताच स्पष्ट कौल मिळालेला असताना समोर समोर बसून  काय हवे , नको ते ठरवायला हवे होते मात्र शिवसेनेने प्रेसच्या माध्यमातून चर्चा केल्या आहेत . हे भाजप नेतृत्वाला आवडले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद काय कुठलेही गृह किंवा अर्थ , नगर रचना , महसूल आदी महत्वाचे पदही मिळणार नाही असे सांगितले जात आहे.

निवडणुकीआधी आणि निकालानंतर शिवसेनेची युती भाजप सोबत असली तरी त्यांची जवळीक राष्ट्रवादी काँग्रेसशी होती आणि आहे याबद्दल  भाजप नेतृत्व सेनेवर नाराज आहे. महायुतीतील मित्र म्हणून भाजप बरोबर सुसंसवाद ठेवण्यापेक्षा त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद अधिक वाढला आहे त्यामुळे भाजप सोबत काय बोलायचे हे त्यांनीच बोलावे , कारण चर्चा त्यांच्याकडूनच बंद झालेली आहे त्यामुळे शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ” प्रतीक्षा करो और देखो ” चा सल्ला दिला असल्याचे वृत्त आहे.

शिवसेना -राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती 

दरम्यान भाजप सेनेचे जुळले नाही तर भाजपकडून त्यांचा इतर राज्यातील अनुभव लक्षात घेता शिवसेना -राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती या पक्षांच्या नेत्यांना अधिक सतावत आहे त्यामुळे भाजपमध्ये जाणाऱ्या आमदारांचे राजकीय भवितव्य असुरक्षित आहे हे दाखविण्यासाठी उदयनराजे भोसले यांचे उदाहरण आमदारांना दिले जात आहे . पण शेवटी राजकारण हे राजकारण आहे हे समजून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आपापल्या आमदारांवर अधिक लक्ष ठेवून आहेत . त्यामुळे सत्ता स्थापनेत घोडा बाजार होऊ नये म्हणून येत्या दोन दिवसात त्यांना सरकार स्थापन होईपर्यंत सर्व एकत्रही ठेवले जाऊ शकते असा अंदाज आहे.

भाजप -सेनेच्या वादात काही नवा पर्याय देता येईल का ? अशी चाचपणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करीत असून त्यासाठीच ते आज सायंकाळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी दिल्लीतील पत्रकारांनी गाठले असता एरवी पत्रकारांशी मुद्दाम बोलणाऱ्या पवारांनी आज काहीही अधिक भाष्य केले नाही. सायंकाळी सोनिया गांधींची आणि त्यांची भेट होणार आहे . त्यानंतर बोलू असे सांगून  त्यांनी चालकाला गाडी काढायला सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!