Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाच्या परिसरात पोलीस आणि वकिलात धुमश्चक्री , वाहनांची जाळपोळ , मारहाण , हवेत गोळीबार

Spread the love

दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात आज पार्किंगच्या वादावरून पोलीस आणि वकिलांमध्ये प्रचंड चकमक  उडाली. पोलिसांनी कोर्ट परिसरातच गोळीबार केल्याने भडकलेल्या वकिलांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत या गाड्यांना आगी लावल्या. त्यानंतर वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना चोप दिला. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला असून तीस हजारी कोर्टाला छावणीचं स्वरूप आलं आहे. यावेळी कोर्ट परिसरात कैद्यांच्या एका वाहनालाही आग लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं. घटनेचे वृत्त समजताच रिपोर्टिंगसाठी आलेल्या पत्रकारांनाही मारहाण झाली.

वृट असे आहे कि , तीस हजारी कोर्ट परिसरातील पार्किंगवरून वाद झाल्याने पोलीस आणि वकिलांमध्ये चांगलीच हिंसा भडकली . पोलीस आणि वकिलांमध्ये वादावादी झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांच्या या कृतीने संतापलेल्या वकिलांनी पार्किंगमधील गाड्यांना आग लावली आणि थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत पोलिसांनीही वकिलांना बेदम मारहाण केली. त्यात एक वकील जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सेंट स्टिफन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

दरम्यान, वाहनांना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले  असून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली आहे. तसेच दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून वकिलांनी कोर्टाच्या गेटला टाळे  ठोकले  आहे. त्यामुळे कुणालाही कोर्टात प्रवेश करता येत नाही. पोलिसांची आणखी एक कुमुक  कोर्ट परिसरात पोहचली असून वकिलांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

प्रारंभी आज दुपारी साडे तीन वाजता हा वाद झाला. विजय नावाच्या एका वकिलाचा एका पोलिसाशी वाद झाला. यावेळी दिल्ली पोलिसांच्या थर्ड बटालियनमध्ये असलेल्या एका पोलिसाने हवेत गोळीबार केला. त्यामुळे सर्वच वकील कोर्ट परिसरात एकत्र जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. कोणतंही कारण नसताना पोलिसांनी तीस हजारी कोर्टाबाहेर गोळीबार केला. त्याचा आम्ही निषेध नोंदवतो. एका तरूण वकिलाला लॉकअपमध्ये मारहाण करण्यात आली. ही पोलिसांची मनमानी आहे. या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावं आणि खटला सुरू ठेवावा. आम्ही दिल्लीतील वकिलांच्या सोबत आहोत, असं दिल्ली बार कौन्सिलचे चेअरमन के. सी. मित्तल यांनी सांगितलं.

दरम्यान  पोलिसाच्या गाडीने एका वकिलाच्या गाडीला धडक दिली. हा वकील कोर्ट परिसरात येत असताना ही घटना घडली. त्यानंतर पोलीस आणि वकिलादरम्यान वाद झाला. यावेळी पोलिसांनी या वकिलाला धक्काबुक्की केल्याचं तीस हजारी बार असोसिएशनचे पदाधिकारी जय बिस्वाल यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!