महाराष्ट्र विधानसभा २०१९ : बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मुद्दे असताना भाजप -सेनेकडून ३७० कलम आणि राममंदिराचा मुद्दा मांडला जातोय : कन्हैयाकुमार

Spread the love

महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे ज्वलंत प्रश्नांना असताना त्यांना बगल देत भाजप-शिवसेनेचे नेते काश्मिर, ३७०, राम मंदीरसारख्या मुद्यांवर विधानसभेसाठी मते मागत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासी, शेतकरी, सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात आमची लढाई सुरू आहे. ‘लढाई बंद कमरे में नहीं मैदान में लढी जाती है’ , यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलो आहे . महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, मात्र राज्यातील प्रश्नावर कोणी बोलत नाही. प्रत्येक वेळी फक्त ३७० आणि राम मंदिरचा मुद्दे का काढले जात आहेत असे प्रश्न युवा नेते कन्हैयाकुमार यांनी उपस्थित केले.

स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. ज्या सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. त्या सावरकरांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देत असाल तर देशाच्या स्वतंत्र लढ्यात शहीद झालेल्या भगतसिंग यांना हा पुरस्कार देऊ नका असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले.

आमखास मैदान येथे गुरुवारी (दि.१७) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार ऍड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर अण्णासाहेब खंदारे, राम बाहेती, अश्फाक सलामी, सांडू जाधव, भाऊसाहेब झिरपे, मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे , यांची प्रमुख उपस्थिती होती.

कन्हैया कुमार पुढे म्हणाले कि , विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं नुकतंच संकल्पपत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला आहे. त्यावरून कन्हैया कुमार यांनी भाजपवर निशाणा साधला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल. औरंगाबाद मधील सावरकर चौकातील रस्ता नीट सत्ताधारी बनवू शकत नसतील तेच राज्यकर्ते आता सावरकर याना भारतरत्न देत असल्याची खंत व्यक्त केली. समांतर पाईपलाईन ३०० कोटीवरून १६०० गेली आहे. तरीही सर्वच गप्प बसले आहेत.

कन्हैयाकुमार  भाजपवर टीका करताना म्हणाले कि , महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे ज्वलंत प्रश्नांना असताना त्यांना बगल देत भाजप-शिवसेनेचे नेते काश्मिर, ३७०, राम मंदीरसारख्या मुद्यांवर विधानसभेसाठी मते मागत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासी, शेतकरी, सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढाई सुरू आहे. ‘लढाई बंद कमरे में नहीं मैदान में लढी जाती है’ , यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलो आहे . महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, मात्र राज्यातील प्रश्नावर कोणी बोलत नाही. प्रत्येक वेळी फक्त ३७० आणि राम मंदिरचा मुद्दे का काढले जात आहेत?. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत.

याशिवाय गेल्या निवडणुकीला भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाले आहेत याबाबत कोणीही विचारत नाही आणि भाजपही त्यावर गप्प आहे’, असे कन्हैया कुमार म्हणाला. सत्ताधाऱ्यांची निती, नियत चांगली नाही. जाती, धर्माच्या नावावर मतदान करण्यापेक्षा जबाबदार शहरवासी म्हणून आपण मतदान करावे, पैसे घेऊन मतदान करू नका, स्वतःला हजार रुपयात विकू नका, असे आवाहन कन्हैया कुमार यांनी केली. तर भाकपची ताकद काय आहे? असा प्रश्न विरोधक नेहमीच विचारत आहेत. मात्र मराठवाडा मुक्त करण्यासाठी भाकप निझामासोबत लढले. अनेक जण या लढ्यात शहीद झाले. जनतेच्या प्रश्नांसाठी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच लढा देत असतात. पाच वर्षातील साडेचार वर्षे भाकप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर असतो. आरोग्य, शिक्षणातील बाजारीकरण रोखण्यासाठी आवाज उठवत असतो. औरंगाबादमध्ये जातीय तेढ वाढले असून या निर्माण झालेल्या असंतोषाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी ३५ मुद्दे मतदारांपुढे मांडून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याचे टाकसाळ यांनी सांगितले. तत्पूर्वी कन्हैया कुमार यांची अण्णाभाऊ साठे चौक, चांदणे चौक, चेलीपुरा, मंजूर पुरा, सिटी चौक, जुनाबाजार, भडकलगेटमार्गे आमखासमैदान दरम्यान वाहन रॅली काढण्यात आली.

आपलं सरकार