महाराष्ट्र विधानसभा २०१९ : शिवसेनेच्या वचननाम्यात मतदारांसाठी आश्वासनांची खैरात

Advertisements
Advertisements
Spread the love

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे .  यातील एकही वचन खोटं ठरणारं नाही, असे  सांगत राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले . उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज (शनिवारी) हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात मदारांवर आश्वासनांची खैरात करण्यात  आली आहे.

Advertisements

१० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलंय. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. तसंच अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला १०००० रुपये जमा करण्याचं वचन शिवसेनेने दिले आहे.

Advertisements
Advertisements

शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार, प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन उभारणार,  राज्यातील १५ लाख पदवीधर तरुणांना युवा सरकार फेलो मार्फत शिष्यत्तीची संधी देणार,  अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणार, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार,  तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी एक्स्प्रेस’ अशा २५०० विशेष बसची सेवा सुरू करणार,  राज्यातील सर्व खेड्यांमधील रस्ते टिकाऊ करण्याचे धोरण आखणार. गावांच्या प्रत्येक वाडीपर्यंत एम-६० म्हणजे सिमेंटचे रस्ते बांधणार,  शहरांच्या विकासासाठी ‘मुख्यमंत्री शहर सडक योजना’ अंमलात अणणार. सर्व नगरपरिषदा, नगरपालिका आणि महागनरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार,  ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार, सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार,  १० रुपयांमध्ये सकस आहार देणार. राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्र स्थापन करणार,  २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत त्या १ रुपयात करणार,  स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षणासाठी कायद्या बनवून भूमिपुत्रांना न्याय देणार,  राज्य सरकारमधील सरकारी नोकरीतील सर्व स्तरातील सर्व रिक्त पदे भरणार, पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री आवास योजना’ अंमलात आणून राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतः घर देणार,  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार,  यापुढे पोलीस भरतीमध्ये पूर्वीप्रमाणे प्रथम मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घेणार या मुद्द्यांचा समावेश आहे.

होय, मी सत्तेसाठीच युती केलीय…

दरम्यान पिंपरी येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. आमच्या काही कुरबूरी होत्या. मात्र, आम्ही सत्तेसाठी युती केली आहे, सत्तेसाठी निवडणूक लढवत आहोत’, अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत दिली. ‘आमचे वाद शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झाले होते. आता शिवसेना आणि भाजप याच एका विचाराने एकत्र आले आहे. गोरगरीबांचे आणि महाराष्ट्राचे भले करण्यासाठी सत्ता हवी आहे’.

पिंपरी मतदार संघतील महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता सभांची आवश्यकता आहे असे वाटत नाही. समोर लढायला कोण आहे. टीका करायची झाली तर करायची कोणावर? राष्ट्रवादीचे नेते शिवसेना भाजपात जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी त्यांचा दरवाजा धरून बसली आहे. तर काँग्रेस आधीच भुईसपाट झाली आहे. दोन्ही पक्षांचा एकमेकांना ताळमेळ नाही. त्यांना उमेदवारदेखील मिळत नाही. अपक्ष उमेदवरांना पाठींबा देण्याची वेळ यांच्यावर आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी ‘आमचं ठरलंय’, असे सांगितले होते. आता संपूर्ण महाराष्ट्रानेच सांगितले आहे की शिवसेना – भाजपचं सरकार निवडून द्यायच आहे हे ‘आमचं ठरलंय’.

आपलं सरकार