Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुशिलकीमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर रंगला कलगी तुरा , पवार म्हणाले ते त्यांच्या पक्षाविषयी बोलले असतील…

Spread the love

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले आहेत, हे सुशीलकुमार शिंदे यांचे उद्गार  विधानसभा निवडणुकीसाठी झंझावाती प्रचारदौरे करत तरुणांच्या प्रभावित करणाऱ्या शरद पवारांच्या पचनी पडले नाही. त्यावर सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाबाबत बोलले असावेत अशा शब्दांत शरद पवार यांनी सुशीलकुमार यांना खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर यांचे पक्ष रिकामे होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण झाले तर किमान विरोध तरी करू शकतील, असा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेत पवारांनी जळगाव जिल्ह्यातील विकासाची सद्यस्थिती, भाजप सरकारची पाच वर्षातील कामगिरी अशा विविध मुद्यांवर मते मांडली.

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले कि , ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत, ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात असेही पवार म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्याबाबतचे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी विलिनीकरणावर प्रतिक्रिया देण्याचे मात्र टाळले आहे.

दरम्यान, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाते विलिनीकरणा करायचे का, याबाबतचा निर्णय स्वत: शरद पवार हेच घेऊ शकतात, सध्या आम्ही दोन्ही स्वतंत्र पक्ष म्हणूनच आमची भूमिका मांडत आहोत, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!