Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Crime : इस्रोतील “त्या ” संशोधकाची हत्या समलिंगी संबंधातून, हैद्राबाद पोलिसांकडून ‘गे’ पार्टनरला अटक

Spread the love

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतील  संशोधकाच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. समलिंगी संबंधातून गे पार्टनरने  एस सुरेश यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. १ ऑक्टोबरला ५६ वर्षीय एस सुरेश यांची हैदराबादेतील राहत्या घरी हत्या झाली होती.

पोलिसांनी तातडीने तपास करत ३९ वर्षीय जनगामा श्रीनिवास या आरोपीला अटक केली. आरोपी एका खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो. समलिंगी संबंधाच्या बदल्यात पैशावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाली असल्याची पोलिसांची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, आरोपी श्रीनिवास आणि संशोधक सुरेश कुमार यांच्यात समलिंगी संबंध होते. श्रीनिवास हा शारीरिक संबंधांच्या बदल्यात सुरेश कुमार यांच्याकडून पैसे घेत असे. 30 ऑक्टोबरला आरोपी हा सुरेश कुमारांच्या घरी चाकू घेऊन गेला होता. हत्या झाली त्या दिवशी दोघांमध्ये संबंध झाले. त्यानंतर आरोपीने पैशाची मागणी केली. पैशावरुन दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने आणलेल्या चाकूने सुरेश यांच्यावर हल्ला करुन त्यांची हत्या केली.

एस सुरेश हे मूळचे केरळचे होते. संशोधक सुरेश कुमार हे गेल्या २० वर्षापासून हैदराबादेत राहेत होते. हैदराबादेतील उच्चभ्रू परिसरातील अमीरपेट  इथल्या अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये ते एकटेच राहात होते. सुरेश हे इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये  कार्यरत होते. मंगळवारी ते कार्यालयात न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर कॉल केला. मात्र त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्यात आला. पत्नी चेन्नईतील बँकेत कार्यरत आहे. सुरेश कुमार यांचा मुलगा अमेरिकेत तर मुलगी दिल्लीत राहते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!