Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ऑनलाईन मीडियाचा वापर करून देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दापाश, तीन अटकेत दोन फरार , दोन मुलींची मुक्तता

Spread the love

ऑनलाईन मीडियाचा वापर करून इच्छुकांना आपल्या जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. या माध्यमातून ग्राहक मिळवायचे आणि  सोशल मीडियावरून संबंधितांना तरुणींचे फोटो पसंतीसाठी पाठवून ग्राहक मिळवले जात होते. या प्रकरणात अंधेरी येथील एका बड्या हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक करून दोन तरुणीची सुटका केली.  गेल्या अनेक दिवसांपासून हि टोळी हा धंदा करीत असून विदेशी तरुणांनींचाही यासाठी वापर केला जात असल्याची माहिती उजेडात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले कि , काही व्यक्ती इंटरनेटवर सांकेतिक शब्दाचा वापर करून देहविक्रय रॅकेट चालवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार ऑनलाईन माध्यमाच्या वापरातून चालू असल्याने हा प्रकार नेमका कुठे चालतो ? आणि यामागे मास्टरमाइंड कोण आहे हे शोधून काढणे अवघड होते. या प्रकरणात युनिट १० चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक निरीक्षक शोभा खरात आणि धनराज चौधरी यांचे पथक अनेक दिवसांपासून हा धंदा चालविणाऱ्यांच्या मागावर होते.

दरम्यान  सेक्स रॅकेटच्या या खेळात  बोगस ग्राहक बनवून या दलालांना अडकविण्याची योजना पोलिसांनी आखली आणि  त्यानुसार इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. त्यात सोशल मीडियावरून पाठविलेल्या तरुणींपैकी एकीला पसंत करण्यात आले. सर्व व्यवहार झाल्यानंतर आणि विश्वास बसल्यानंतर अंधेरी पूर्वेकडील हॉटेल रॉयल इलाईट या ठिकाणी बोलविण्यात आले. बोगस ग्राहकासह पोलिसांचे पथक या ठिकाणी पोहोचले असता दोन तरुणी आणि तीन तरुण सापडले. पोलिसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले. या तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या गुल्ली नमन यादव, संतोष यादव आणि अशोक यादव या तिघांना पोलिसांनी अटक केली तर दोघे अद्याप फरार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!