Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतला बातमी : काय आहे #Howdy Modi ? आणि काय आहे मोदींचा अमेरिका दौरा ?

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान होणारी  यूएनजीएची (UNGA)बैठक आणि ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi) हे कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. टेक्सासमधील ह्यूस्टन शहरातील NRG फुटबॉल स्टेडिअमवर ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘हाउडी मोदी’ हा कार्यक्रम तीन तासांचा असणार आहे. या कार्यक्रमास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील हजर राहणार आहेत.


काय आहे #Howdy Modi ?

‘Howdy’ हा शब्द ‘How do you do’ याचं संक्षिप्त रूप आहे. ‘Howdy’ या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘तुम्ही कसे आहात’. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये ‘Howdy’ या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक)या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 5 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली आहे. 


या कार्यक्रमाची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. ह्यूस्टनमधील भारतीय अमेरिकी नागरिकांनी पंतप्रधान मोदींसाठी ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. यावेळी भल्यामोठ्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी भव्यदिव्य सभेला संबोधित देखील करणार आहेत.

अमेरिकेतील ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला  आहे.  या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी-भारतीय उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.  ह्यूस्टनमधील एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये ही सभा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

एक आठवड्याच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनर्जी सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यूस्टनमध्ये तेल क्षेत्रातील सीईओंसोबत पहिली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिकेदरम्यानचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील यूएनजीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर अमेरिकेचा एकही अधिकारी पोहोचला नाही. यामुळे त्यांची पुन्हा एकदा जगासमोर फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तान आणि पंतप्रधान इमरान खान यांच्या अमेरिकेत झालेल्या या अपमानाची जगभरासह पाकमधील पत्रकारांनाही सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात  आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या  दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. तसंच याशिवाय न्यूयॉर्क येथे अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमनच नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. विशेष म्हणजे  म्हणजे नरेंद्र मोदींच्या नंतर काही वेळाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील बोलणार आहेत.

अमेरिकेतील ट्रम्प सरकार भारत-अमेरिकादरम्यान व्यापाराशी संबंधित अनेक सामंजस्य करार करण्याबाबतच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात पंतप्रधान मोदींशी झालेल्या बैठकांनंतर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नव्या बाजाराच्या शोधात आहेत.


विमातळावर मोदी हस्तांदोलन करता करता खाली वाकले आणि चर्चा सुरु झाली : अखेर खाली का वाकले मोदी ?

दरम्यान, रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळीच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. यावेळेस ह्यूस्टन विमानतळावर एक अशी घटना घडली की ते दृश्य पाहून लोकांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव सुरू आहे. पंतप्रधान मोदींचं स्वच्छता प्रेम केवळ देशातच नाही तर परदेशातही सर्वश्रुत आहे. अमेरिकेच्या धरतीवरूनही मोदींनी स्वच्छता अभियानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. विमानतळावर अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी  पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. यादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला अधिकाऱ्यानं पंतप्रधान मोदींचं स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ भेट स्वरुपात दिला. यावेळेस फुलांच्या गुच्छ्यातील एक दांडी खाली जमिनीवर पडली. ही बाब जशी पंतप्रधानांच्या लक्षात आली तसं त्यांनी लगेचच स्वतः खाली वाकून ती उचलली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याच्या हातात दिली.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!