Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या ‘ भेटीबद्दल निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केला मोठा खुलासा

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेच्या  वेळी आपण घेतलेली भेट केवळ भेट केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यासाठी घेतली. ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ काढू नये. मी समाजसेवेचा वसा हाती घेतला असून शेवटपर्यंत हा वसा पुढे नेणार आहे. मी राजकारणात प्रवेश करणार नसून कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केला आहे.

संगमनेरमध्ये काल पार पडलेल्या महाजनादेश यात्रेत निवृत्ती महाराज इंदुरीकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे इंदुरीकर महाराज भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ धनादेश देण्यासाठी महाजनादेश यात्रेत गेलो होतो. कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनात ठेवून या यात्रेत सहभागी झालो होतो. मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द केल्यानंतर कोणत्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता मी कार्यक्रमातून निघून गेलो होतो. मला राजकारणात उतरायचे असते तर मी कार्यक्रम संपेपर्यंत तिथे थांबलो असतो. मात्र समाजसेवेचं व्रत मी हाती घेतल्याने कधीही राजकारणात जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत. त्यात काही तथ्य नसून या बातम्यांना मी पूर्णविराम देत आहे, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!