Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अखेर खासदार उदयनराजेंचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त झाला निश्चित ! उद्या मोदी-शहा -गडकरींच्या उपस्थितीत करणार प्रवेश !!

Spread the love

राष्ट्रवादीचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आपला भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे, दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते शनिवार १४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाहीतर भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी उदयनराजे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे आज सकाळीच खासदार उदनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीनंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असं बोललं जात होतं. मात्र आता त्यांच्या प्रवेशाची तारीखच समोर आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

तर या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटले होते की, “उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून बाहेर जाण्याची चर्चा झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत.

मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं होतं. याबद्दल उदयनराजे यांनी मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती. यामुळे उदयनराजे नेमकं काय करणार आहेत याबद्दल तर्क वितर्क लढवले जात होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!