Current News Update : गुरुवारी महाराष्ट्रासह तिन्हीही राज्यात लागू शकतात निवडणूका !!

Spread the love

महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता  वृत्त वाहिन्यांनी वर्तविली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र , हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते असे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पहिल्यांदा  निवडणुका होतील. मात्र  अद्याप या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. या दोन्ही राज्यात दिवाळीच्या आधी नवे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणे संदर्भात उद्या केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच १२ तारखेलाच ही घोषणा केली जाऊ शकते असे सूत्रांकडून कळते.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी ९० आणि ८२ जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर २०१४ विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातील २८८ पैकी १२२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. हरियाणातील ९० पैकी ४७ जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. झारखंडमध्ये ७७  पैकी ३५ जागांवर विजय मिळवत भाजपने सत्ता मिळवली होती आणि रघुबर दास हे मुख्यमंत्री झाले होते.

आपलं सरकार