Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा : आर.आर. पाटील (आबा) यांच्या पत्नीच्या विरोधात लढण्याची आठवलेंच्या पत्नीची इच्छा !!

Spread the love

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील (आबा) यांच्या पत्नी, आमदार सुमनताई पाटील यांच्या विराेधात तासगाव- कवठे महांकाळ मतदारसंघातून लढण्याची तयारी रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी दर्शवली आहे.

सांगलीतील तासगाव मतदारसंघ म्हणजे आबांचा बालेकिल्ला असून  २०१४ च्या निवडणुकीतही ते िवजयी झाले होते  मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर  पाेटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई विजयी झाल्या. आताही राष्ट्रवादीकडून सुमनताईंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते संजयकाका पाटील यांनी भाजपात प्रवेश करून २०१४ मध्ये सांगलीची खासदारकी मिळवली. आता त्यांच्या पत्नी ज्याेती पाटील यांनी भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लाेकसभा निवडणुकीपासूनच त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या दाेघींत मुख्य लढत हाेण्याचा अंदाज आजवर वर्तवला जात हाेता. मात्र आता अचानक सीमा आठवले यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने रंगत वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!