Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुहेरी हत्याकांड ! दिराने केला वहिनी-पुतण्याचा खून; रात्रभर राहिला मृतदेहांसोबत

Spread the love

गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईत गुन्ह्यांचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. आताही पनवेलच्या कामोठेमध्ये दुहेरी हत्याकांड समोर आलं आहे. दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण कामोठे परिसरात बऱ्यापैकी शांततेचं वातावरण असतं. त्यात खुनाचा असा प्रकार समोर आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कामोठे सेक्टर ३४ मधील एकदंत सोसायटीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. अवजड वस्तू डोक्यात घालून दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

वहिनी जयश्री चव्हाण आणि 2 वर्षाचा पुतण्या अविनाश चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. तर सुरेश चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी दिर हा त्यांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. तो कोणतीच प्रतिक्रिया देत नाही आहे. दरम्यान, हत्या झाल्याचं शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी सुरेश चव्हाण याला ताब्यात घेतलं आहे. तर संपूर्ण तपासानंतर त्याच्यावर दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून वहिनी आणि पुतण्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!