Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बदली केली म्हणून हाय कोर्टाच्या मुख्य नायायाधीशांनी दिला राजीनामा

Spread the love

मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरमानी यांनी बदलीविरोधात राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीअमने त्यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात केली होती. त्याच्याविरोधात विजया ताहिलरमानी यांना आपला राजीनामा राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे पाठवला. राजीनाम्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.

न्या. ताहिलरमानी यांची २६ जून २००१ मध्ये मु्ंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली होती. तर, १२ ऑगस्ट २००८ रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. न्या. ताहिलरमानी या २ ऑक्टोबर २०२०मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. न्या. ताहिलरमानी आणि न्या. गीता मित्तल या देशातील २५ उच्च न्यायालयात या दोन महिला मुख्य न्यायाधीशपदी आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजिअममध्ये न्या. एस.ए. बोबडे, एन.व्ही. रमना, अरुण मिश्रा आणि आर.एफ. नरीमन यांचा समावेश होता. मेघालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. ए.के. मित्तल यांची बदली मद्रास हायकोर्टात करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!