Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” मी राष्ट्र्वादीतच , साहेबांसोबत …” भजबळांनी दिला सेना प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

Spread the love

‘मी राष्ट्रवादीतच आहे. वावड्या उठवण्याचं काम माध्यमं करत आहेत. कोण सूत्र यांना काय सांगतोय, हे स्पष्ट करा म्हणावं. मी साहेबांसोबतच आहे आणि आज बैठकीला आलोय. आता बास इतकच,’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा खोडून काढत फटकारलं आहे.

विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. यावेळी भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे बाहुबली नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. छगन भुजबळ यांच्या प्रवेशावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं. स्थानिक कार्यकर्त्यांनी भुजबळांनी लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी केली, तर नेते मात्र विरोधाचा सूर आळवत राहिले. मात्र आता छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हेदेखील उपस्थित आहेत.  त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!