Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोने चकाकले , ४० हजाराचा टप्पा ओलांडला , चांदीही ४५ हजाराच्या पलीकडे

Spread the love

सोन्याचा आजचा भाव ४० हजाराच्या वर गेला आहे. तर चांदीचे दरही वाढले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्यादरावर दिसून येत आहे. सोन्याच्या वाढलेल्या किंमतीने नवा इतिहास रचला आहे. सोमवारी सराफ बाजार उघडताच सकाळी ११ वाजताच्या सुमारास सोन्याचा दर ३९ हजार रुपये होता. साधारण दीड वाजताच्या सुमारास सोन्याच्या भावाने ४० हजाराचा टप्पा ओलांडला. सोन्याबरोबर चांदीचा दरही ४५ हजारांच्या पलीकडे गेलेला आहे. चीनने अमेरिकेकडून आयात केलेल्या वस्तूंवर ७५ अरब डॉलर अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वाढत जाऊन वर्षभरात सोने तब्बल 9 हजार रुपये प्रती तोळा तर चांदी साडेतीन हजार रुपये प्रती किलोने महागली आहे. अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत. शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली, तरी सोने ६०० रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली. विदेशात वाढलेली या धातूंची खरेदी व विदेशी वायदे बाजारातून निघणारे वाढीव भाव, यामुळे भारतातही भाव वाढत आहेत.

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. गेल्या वर्षी २ ऑगस्ट २०१८ रोजी ३० हजार २०० रुपयांवर असलेले सोने या वर्षी ऑगस्ट महिन्यात 40 हजाराच्या पुढे गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!