Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : महिलेची ७६ लाखांची फसवणूक, पेट्रोलपंपचालक अटकेत

Spread the love

औरंगाबाद -जुन्या ओळखीचा फायदा घेत चारवर्षांपूर्वी महिलेची ७६ लाख ५० हजारांची फसवणूक करणारा शहरातील पेट्रोलपंपचालक अखिल अब्बास यास आर्थिक गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या त्याच्या विरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिल अब्बास याचा क्रांती चौकात पेट्रोलपंप आहे.चार वर्षापूर्वी अब्बासने कचर्‍याच्या गाड्या सप्लाय करण्यासाठी कौटुंबिक संबंध असलेल्या रागिनी जयेश पटेलयांच्याकडून सप्टेंबर २०१५ मधे ५१ लाख रु. व्यावसायिक भागिदार म्हणून घेतले होते. पण या व्यवसायतला नफा किंवा मुद्दल परत करंत नव्हता. रागिनी पटेल यांनी वेळोवेळी पैशाचा विषय काढल्यानंतर अखिल अब्बास ने त्यांना पैशे परत करत नसल्याबाबत धमक्या दिल्या शेवटी कंटाळून जून २०१९ मधे रागिनी पटेल यांनी आर्थिक गुन्हेशाखेकडे धाव घेत तक्रार दिली होती. पटेल पोलिसांकडे गेल्या आहेत हे कळल्यावर अखिल अब्बास ने त्यांना ५०हजार रु दिले.पोलिसांनीही अब्बासला यावर खुलासा मागितला असता त्याने दिला नव्हता. दरम्यान १आॅगस्ट रोजी पटेल यांनी व्यवसायातील नफ्याबाबत अब्बास ला विचारले असता त्याने काहीही बोलण्यास नकार देत पुन्हा न भेटण्याची धमकी दिली. त्यामुळे रागिनी पटेल यांनी पोलिसांकडे शुक्रवारी दुसरा अर्ज देताच पोलिसांनी अखिल अब्बासला बेड्या ठोकल्या या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय सूर्यवंशी करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!