News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

नगरमध्ये मुसळधार

नगर शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी दीड तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे महापालिकेसह प्रशासकीय यंत्रणेचा कारभार उघडा पडला आणि नगरकरांचे हाल झाले. शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांमध्ये बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

Advertisements

नागपूरः अश्लील चित्रफित दाखवून चिमुकलीवर अत्याचार; अंबाझरीतील घटना, नराधम समीर मुनीर शेख याला अटक

Advertisements
Advertisements

पुणेः वैद्यकीय क्षेत्रात रोग निदान चाचण्यांना वेगळे महत्व प्राप्त करून देणाऱ्या गोळविलकर लॅबचे संस्थापक डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडामध्ये  निधन

उत्तर प्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका

ठाणेः शेतातून घरी परतत असताना अंबाडी येथील उंबरपाडा कॉलनीतील प्रमिला मंगल्या वाघे यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू

मुंबईः अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील २० लाख बालकांना देणार मोफत रोटाव्हायरस लस; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

अहमदनगरः नीता अंबानी यांच्याकडून शिर्डीच्या साईबाबा संस्थानला एक कोटी १७ लाख रुपयांचे संरक्षण साहित्य दान; बॅग स्कॅनर, हँड डिटेक्टर, वॉकी टॉकी यांचा समावेश

नागपूरः शिकण्याची दारे बंद केल्याने संस्कृत मागे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य

लातूरमध्ये भाजपाचा बोलबाला; तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी

अकोला : बोरगाव मंजू ठाण्याअंतर्गत कानशिवणी येथे मुलाने केली वडिलांची हत्या.

आपलं सरकार