Aurangabad : उस्मानपुरा पोलिसांनी आवळल्या कुख्यात सनी जाधवच्या मुस्क्या ,पावणे दोन लाखांचे दागिने जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – कुख्यात सनी जाधव (२४) रा. कोकणवाडी याला उस्मानपुरा पोलिसांनी ४१ ग्रॅम सोने आणि १ किलो चिंदीच्या ऐवजासह अटक केली.
सनी जाधव याने २०१५ ते २०१९ या चार वर्षाच्या काळात ज्योतीनगर, प्रतापनगर, दशमेशनगर, पीरबाजार, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन याभागात वरील ऐवजासाठी घरफोड्या केल्या आहेत. आता पर्यंत त्याच्यावर घरफोडीचे जवळपास ५० गुन्हे दाखल आहेत. एखाद्या गुन्ह्यातून शिक्षा भोगून बाहेरआल्यानंतर एक महिन्याच्या आत तो घरफोडी करतो.असे पोलिसांच्या निर्दशनास आले आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कल्याण शेळके पोलिस कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे,मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ संजयसिंग डोभाळ यांनी पार पाडली.

Advertisements

सामुहिक कॉपी प्रकरणी तिघाविरूध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements

औरंंंगाबाद : दहावीच्या परिक्षेत सामुहिक कॉपी करून परिक्षा सेंटरवर गैरप्रकार केल्या प्रकरणी तीन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामुहिक कॉपीचा प्रकार सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील सरस्वती भुवन हायस्वूâल येथे ११ मार्च २०१९ रोजी घडला होता. सरस्वती भुवन हायस्वूâल येथील शिक्षक बी.एन.कोठावदे, प्रदीप महालपुरे, संदीप महालपुरे यांनी परिक्षार्थी विद्याथ्र्यांना विविध प्रकारचे गाईड आणि हस्तलिखीत कॉप्या पुरवून परिक्षा सेंटरवर गैरप्रकार केला होता. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब भिकनराव चव्हाण (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून परिक्षेत गैरप्रकार करणाNया तिघाविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सामुहिक कॉपीचा हा प्रकार सोयगाव तालुक्यतील गोंदेगाव येथे घडला असल्याने पोलिसांनी हा गुन्हा सोयगाव पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.

आपलं सरकार