Mumbai : मराठी कलाकार, तंत्रज्ञांना मिळणार ‘म्हाडा’चं हक्काचं घर : आदेश बांदेकर

Advertisements
Advertisements
Spread the love

‘म्हाडा’ने घेतलेल्या एका निर्णयामुळे कलाकारांनाही हक्काचं घर मिळणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, सिनेमा- टिव्ही आणि मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना आता ‘म्हाडा’मार्फत स्वस्तात घरं उपलब्धं होणार आहेत. त्यासाठी आज शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ‘म्हाडा’मार्फत स्वस्तात घरे उपलब्ध करुन दिली जातात. ‘म्हाडा’मुळे मुंबईत घर घेण्याची अनेकांची इच्छा पूर्ण झाली आहे.

Advertisements

कलाकारांना स्वस्तात घरं उपलब्ध व्हावीत यासाठी बरेच प्रयत्न सुरु होते. या बैठकीत अनेक कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच ‘म्हाडा’ची घरं उपलब्ध करण्यात येतील असे सांगण्यात आले. “मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरं उपलब्धं करून देण्यात येतील.” असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितलं. “या योजनेमुळे बँकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळेल.” असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं. या बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार,दिगंबर नाईक, नितीन घाग,विद्या खटावकर,राणी गुणाजी,कलाकार,आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते. दरम्यान, महाराष्ट्रात १४ हजार ६२१ घरांची लॉटरी निघणार आहे. मुंबईत, गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरांची लॉटरी निघेल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार