Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आमदार नितेश राणे यांच्यासह १८ कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

Spread the love

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व त्यांच्या १८ समर्थकांना आज सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या सर्वांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी नितेश राणे व अन्य १८ जणांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यावर सुनावणी होऊन प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दर रविवारी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावावी आणि खटल्यात सहकार्य करावे, अशा शर्थी सर्वांना घालण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून यावरून नितेश राणे व त्यांच्या समर्थकांनी ४ जुलै रोजी महामार्गावरच जोरदार राडा केला होता. याबाबत उपअभियंता प्रकाश शेडकर यांना जाब विचारतानाच त्यांच्यावर नितेश समर्थकांनी हल्ला केला होता. यावेळी रस्त्यावरील चिखल बादलीत भरून तो शेडकर यांच्या अंगावर ओतण्यात आला होता. कणकवलीतील गडनदीच्या पुलावर शेडकर यांना बांधून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नितेश व त्यांच्या १८ समर्थकांना अटक केली होती. या सर्वांना आज सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!