Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सिने अभिनेते बोमन इराणी यांच्या यश कथेलाही संघर्षाची किनार ….

Spread the love

कोणत्याही यशस्वी व्यक्तीचे यश दिसते परंतु त्यामागचा त्या व्यक्तीचा संघर्ष दिसत नाही . अशा अनेक Stories  आपल्या अवती भवती असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही . याच मालिकेत आज यशाच्या शिखरावर बसलेल्या या अभिनेत्याचा प्रवासही असच थक्क करणारा आहे . आणि ते अभिनेते आहेत बोमन इराणी . मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या बोमन इराणीचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यापासून ते ३५ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापर्यंतचा बोमनचा प्रवास प्रेरणादायी आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर त्यांची स्ट्रगल स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. त्यांची हि जीवनकथा सिनेक्षेत्रात संघर्ष करणारांना नक्कीच प्रोत्साहन देणारी आहे . त्यांनी आपली हि कथा सांगताना काय म्हटलंय ते वाचा .

‘माझा जन्म होण्यापूर्वीच वडिलांचं निधन झालं होतं. ते वेफर्सचं दुकान चालवायचे आणि त्यांच्या निधनानंतर आई ते दुकान चालवू लागली. आईला अनेक वर्ष संघर्ष करताना मी पाहिलंय. मी जेव्हा शाळेत जाऊ लागलो होतो, तेव्हा मला बोलण्याचा आणि कोणतीही गोष्टी समजून घेण्याचा, शिकण्याचा त्रास होता. बोलण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मी गायन शिकू लागलो. गायनाच्या एका कार्यक्रमात श्रोत्यांकडून माझ्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. तो आवाज माझ्या आईने रेकॉर्ड केला होता. मी जेव्हा जेव्हा तो आवाज ऐकत असे तेव्हा तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास अधिक दृढ व्हायचा. मी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं पण नाटक आणि इतर कलांमध्ये मी नेहमी सहभागी व्हायचो. कॉलेजचं शिक्षण संपल्यावर मला माझ्या कुटुंबीयांची मदत करायची होती. काम करायचं होतं. ताज हॉटेलच्या व्यवस्थापकाची मी भेट घेतली आणि रुफटॉप रेस्टॉरंटमध्ये काम करण्याविषयी त्याला विचारलं. तो म्हणाला, टॉपला पोहोचायचं असेल तर आधी खालपासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे त्याने मला रुम सर्व्हिसचं काम दिलं. दीड वर्षानंतर मला तिथल्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम मिळालं.’

View this post on Instagram

Posted @withrepost • @officialhumansofbombay “I lost my dad before I was born. He ran a wafer shop & after him my mom took over. My sisters had school, so my mom had to leave me at the fire temple with the priest’s wife, while she ran shop. I watched her fighting alone, for years. Soon I started school, but I had speech & learning disabilities. I remember, I had started singing to better my speech. And once at a performance, mom recorded the applause I got. It was so loud! I kept hearing it, it got my confidence back! I studied science after school, but I’d still take part in theatre & other arts. After college got over, I had to start contributing to the family. So I met the manager of a Taj hotel & asked for work at the rooftop restaurant. He said, ‘To reach the top, you have to start from the bottom.’ So he sent me to work in room service. Only after a year & a half did I become a waiter at that restaurant! Soon after, my mom met with an accident, so I quit my job & sat at the shop. And before I knew it, 14 years went by — during that time I met my wife, got married & even had kids. But throughout, something was amiss. So my wife encouraged me to explore. I loved photography & my dad was a photographer too. So I tried that & after some struggle, I started doing well. At the time, a friend got me to audition for an ad. I did & I got selected! So I decided to pursue it & in a few years I did over 180 ads & even some popular plays. I was also offered a short film. It had a low budget & was going to be shot on a handycam, but for me it was a golden opportunity! My life changed completely, when Vidhu Vinod Chopra saw a clip of the film. He got in touch & asked to meet me. When we met, he gave me a cheque of 2 lakhs to be in his next film. He didn't even have a film yet, but he didn't want me to become famous & not give him dates. That’s when Munnabhai MBBS happened & at 35, my dream career began. It was unexpected – but I grabbed the opportunity & didn’t let go. It’s been an amazing journey, one that did put me through some turbulence. But through all the good, the bad & the ugly, I learned to keep my hopes up & more than anything, know that it’s never too lat

A post shared by Boman Irani (@boman_irani) on

‘वेटर म्हणून कामाला लागल्यावर माझ्या आईचा अपघात झाला. त्यामुळे मी काम सोडून आईचं दुकान चालवू लागलो. अशीच १४ वर्षे गेली. माझं लग्न झालं, मुलंबाळं झाली पण आयुष्यात कसलीतरी कमतरता सतत जाणवत होती. तेव्हा माझ्या पत्नीने मला प्रोत्साहन दिलं. मला फोटोग्राफीची आवड होती आणि माझे बाबासुद्धा फोटोग्राफी करायचे. मी फोटोग्राफी करत असताना एका मित्राने मला जाहिरातीच्या ऑडीशनसाठी बोलावलं. जाहिरातीसाठी मी निवडलो गेलो आणि काही वर्षांत मी तब्बल १८० हून अधिक जाहिरातींमध्ये काम केलं. काही लोकप्रिय नाटकांमध्येही काम मिळालं. त्यादरम्यान एका लघुपटाची ऑफरसुद्धा मला मिळाली. त्याचा बजेट खूप कमी होता आणि तो हॅँटीकॅमवर शूट होणार होता. पण माझ्यासाठी ती सुवर्णसंधी होती. हा लघुपट विधू विनोद चोप्रा यांनी पाहिला आणि मला भेटण्यासाठी बोलावलं, तेव्हा माझं आयुष्यचं पालटलं. जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला २ लाख रुपयांचा चेक दिला आणि त्यांच्या आगामी चित्रपटात मला संधी दिली. तेव्हा वयाच्या ३५व्या वर्षी मी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात काम केलं. माझं स्वप्नवत करिअर सुरू झालं. हे सगळं अनपेक्षित होतं पण मला संधी मिळाली आणि ती मी जाऊ दिली नाही. या प्रवासात अनेक चढउतार आले. पण या चढउतारांमध्येही मी आशा सोडली नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीला कधीच उशीर झालेला नसतो हे मी शिकलो.’

आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन कधीच नसतं हे बोमन इराणीच्या स्ट्रगल स्टोरीतून नक्कीच शिकायला मिळतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!