Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : मुंबईत नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश , पाच महिलांसह सहा जणांना अटक

Spread the love

मुंबई शहरात नवजात बालकांची विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच महिलांसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुनंदाभिमा मसाने,सविता मंगेश साळुंखे, भाग्यश्री भगवंत कोळी, आशा ऊर्फ ललिता डॅनियस जोसेफ, अमर विलास देसाई आणि भाग्यश्री विनोद कदम, अशी या आरोपींची नावे आहेत. यातील अमर आणि भाग्यश्री कदम यांनी इतर चारही महिलांकडून नवजात बालक खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सहाजणांना लोकल कोर्टाने ४ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , काही महिला आर्थिक लाभासाठी नवजात बालकांची बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी यांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील आबूराव सोनावणे, अर्पणा जोशी, चंद्रकांत दळवी, महेंद्र घाग,महेश तोरस्कर, अनिल गायकवाड, योगेश लाखमडे, रामचंद्र इंदुलकर यांच्यासह इतर पोलीस पथकाने संबंधित महिलांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच गोवंडीसह मानखुर्द, ठाणे, कल्याण परिसरातून सुनंदा, सविता,भाग्येश्री आणि आशा या चार महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच असहाय्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना हेरुन त्यांच्याकडून त्यांचे नवजात बालक घेऊन त्यांची गरजू व्यक्तींना विक्री करीत असल्याचे उघडकीस आले.

कल्याण येथे राहणार्‍या अमर देसाई यांना ३ लाख ८५ हजार तर, भाग्येश्री कदम यांना २ लाख ५० रुपयांमध्ये दोन बालकांना विकल्याचे चौकशीत सांगितले. या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातील भाग्येश्री ही पदवीधर गृहिणी आहे. तिला मूल होत नव्हते तर, अमर हा एका खाजगी कंपनीसाठी चालक म्हणून काम करीत आहे. त्याला तीन मुली असून एका मुलाची गरज होती, त्यासाठी या दोघांनी याचार महिलांकडून नवजात बालक खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडील दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही पुढील कारवाईसाठी चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या एका संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. चौकशीत या चारही महिलांना इतर दोन मुलांची विक्री केल्याची कबुली दिली आहे. या मुलांसह त्यांना खरेदीकरणार्‍या व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दोनमुलांपैकी एका मुलाच्या आईचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तिचे मुल दिल्यानंतर त्यांनी तिला एक लाख रुपये दिले होते. यातील सविता ही सध्या गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात महिला सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. तीन वर्षापूर्वी तिला रस्त्यावरील एका मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर तिच्यावर आरोपपत्रसादर करण्यात आले होते. सध्या ती जामिनावर होती. त्यानंतर तिने अन्य एका सात दिवसांच्या नवजात मुलाचे अपहरण केले होते.

जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने स्वत:ची एक टोळी तयार केली होती. गरिबीमुळे तसेच पैशांची गरज असलेल्या महिलांचा विश्वास संपादन करुन ही टोळी त्यांच्याकडून त्यांचे मुले घेऊन त्यांना चांगल्या घरात दत्तक देत असल्याचे सांगत होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही महिलांनी त्यांचे मुले त्यांच्याकडे सोपविले होते. तिनेइतर तिघींच्या मदतीने इतर दोन मुलांची विक्री केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत सहाही आरोपींना पोलीसांनी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर धक्कादायकखुलासे होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी वर्तविली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!