Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चेन्नईत भीषण पाणी टंचाई , इडली डोसा आणि बटर घेणारांना एक बदली पाणी !!

Spread the love

तामिळनाडूची राजधानी चेन्नईत पाण्याचं भीषण संकट निर्माण झालेलं असतानाच येथील एका दुकानदाराने मात्र गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. एक किलो इडली, डोसा बटर खरेदी केल्यास एक बादली पाणी मोफत देण्याची घोषणा त्यानं केली आहे.

सी.एन. पार्थसारथी यांनी असं या दुकानदाराचं नाव आहे. पाण्याचं संकट आहे, म्हणून गावकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न नाही. पाण्याच्या बदल्यात इडली-डोसा खरेदी करण्यास आम्ही भाग पाडतो आणि या अतिरिक्त पैशातूनच आम्ही खासगी टँकरद्वारे पाणी मागवतो, असं पार्थसारथी म्हणाले.

आपण दोन दशकांपासून या गावात काम करत आहोत. त्यामुळे संकटाच्या समयी गावकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांना मदत करण्यासाठी हा उपाय शोधून काढण्यात आला. पाण्याची समस्या संपल्यानंतर ही योजनाही बंद करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!