Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एक देश एक निवडणूक विषयावर मोदींची सर्वपक्षीय बैठक , राहुल , ममता , केजरीवाल आदींची मात्र अनुपस्थिती

Spread the love

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विविध पक्षीय नेत्यांशी चर्चा केली. काही विरोधी पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. लोकसभा किंवा राज्यसभेत किमान एक खासदार असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना मोदींनी एकत्रित निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीला बोलावले होते.

एक देश, एक निवडणूक, २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि महात्मा गांधींचे हे १५० वे जयंती वर्ष आहे त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मोदींनी बैठक बोलावली होती. संसदेच्या ग्रंथालय इमारतीत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्लाही या बैठकीला उपस्थित होते.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, डीएमकेचे एमके स्टालिन, टीडीपीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मतदान यंत्राबद्दल बैठक असती तर मी सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिले असते असे टि्वट मायावती यांनी केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!