Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Budget 2019 : अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमलेबाजी’, कर्ज आणि व्याजाचा डोंगर : अशोक चव्हाण

Spread the love

राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या वाढीचा दर आणि राज्यावरील कर्जाचे प्रतिवर्षी वाढणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर अधिकाधिक चिंताजनक बनत चाललेले आहे. कर्जाचा डोंगर कमी करण्याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना सरकारकडे नाही. तरीही सरकारने पुढील विधानसभा निवडणुकीत मते मिळावीत म्हणून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. परंतु, त्यासाठी पैसा कसा उभा करणार, याची स्पष्टता यात दिसून आली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमलेबाजी’असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाजप-शिवसेना सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कि , यंदा वाढलेली प्रचंड महसुली तूट आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प फुटल्याने हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. हा सलग तिसरा तुटीचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी सुमारे १५  हजार कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ही तूट यंदा २० हजार २९२ कोटींवर गेली आहे. हे सरकारच्या ‘अर्थ’शून्य व नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे. या अर्थसंकल्पात  शेतकरी, कामगार,  व्यापारी,उद्योजक, महिला, बेरोजगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्यंक अशा कोणत्याही घटकाला दिलासा मिळालेला नाही.

दुष्काळाच्या मदतीबाबत सरकारने केलेले दावे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याचा सरकारचा दावा संशयास्पद आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही थेट भरीव आर्थिक मदत मिळालेली नसून,सरकार प्रामाणिक असेल तर त्यांनी दुष्काळी मदतीच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!