किर्गिझस्तान : बिश्केकच्या बैठकीत नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात अखेर फक्त ‘दुआ-सलाम’!

Spread the love

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत सर्वांचं लक्षं लागलंय ते भाराताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे. नरेंद्र मोदी हे इम्रान खान यांना भेटणार नाहीत असं भारतानं स्पष्ट केलं. तर मोदी आणि इम्रान खान यांची भेट व्हावी यासाठी पाकिस्तानने सर्व पातळीवर आटोकाट प्रयत्न केला. पण दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरू राहूच शकत नाही असं भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

Advertisements

या बैठकीदरम्यान मोदी आणि इम्रान खान अनेकदा समोरासमोर आले होते मात्र त्यांच्यात काहीच बोलणं झालं नाही की नमस्कारही झाला नाही. मात्र शेवटच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहुन स्माईल दिलं आणि नमस्कार केला. इम्रान खान यांनी मोदींना निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या अशीही माहिती सूत्रांनी दिलीय.

13 जूनच्या रात्री किर्गिझस्तानच्या राष्ट्रपतींनी सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी शाही मेजवानी दिली. या मेजवानीला पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांची पहिल्यांदा समोरासमोर आले. मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि इम्रान खान हे एकाच गोल टेबलवर जेवायला बसले होते.  मोदी यांच्यापासून खान हे तीसऱ्या क्रमांकावर बसले होते. मात्र दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांना बोलणं टाळलं होतं.

 

आपलं सरकार