Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेसच्या खुल्या ऑफर बद्दल काय बोलताहेत प्रकाश आंबेडकर ?

Spread the love

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज १८ लोकमतसोबत बोलताना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही ऑफर दिली होती. पण काँग्रेसकडून सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. तुम्ही सलग तीन निवडणुकांत हरलेल्या १२ जागा आम्हाला द्या, असं आम्ही त्यांना म्हटलं होतं. पण काँग्रेसनं अनुकुलता दाखवली नाही. त्यानंतर निवडणुकीत आणि आता निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आमच्यावर भाजपची बी टीम असा आरोप होत आहे. त्यामुळे आमच्या आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने या आरोपाबाबत एकदा आपली भूमिका जाहीर करावी,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या ऑफरवर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत विचारमंथन करू. त्यानंतर आमची या आघाडीबाबतची भूमिका जाहीर करू. पण आम्ही आमचा फायदा असणाराच निर्णय घेऊ,’ असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आताच विधानसभा निवडणुकीतले आपले पत्ते ओपन करण्यास नकार दिला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!