Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी यांच्या मंत्रिमंडळाबाबत मोदी शहा यांच्या चार तास चर्चा …

Spread the love

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) घवघवीत यश मिळाल्यानंतर ‘मोदी सरकार-२’चा चेहरा कसा असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज यावर तब्बल चार तास खलबतं झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

मोदी-शहा यांच्यातील बैठकीनंतर त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी बैठकीत नव्या मंत्रिमंडळाबाबत विस्तृतपणे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘मोदी सरकार-२’मध्ये जवळपास २० टक्के नवे चेहरे असतील व अनेक युवा चेहऱ्यांना सधी दिली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आधीच्या सरकारमधील अनुभवी व ज्येष्ठ मंत्र्यांची नव्या मंत्रिमंडळातही वर्णी लागणार, हे निश्चित असले तरी त्यांची खाती मात्र बदलली जाणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषत: गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या प्रमुख खात्यांना नवे मंत्री मिळणार आहेत. गृह मंत्रिपदासाठी अमित शहा यांच्या नावाची तर अर्थ मंत्री म्हणून पीयूष गोयल यांच्या नावाची चर्चा आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण तर निर्मला सीतारामन यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांची वर्णी लागते, हे उद्या रात्रीपर्यंत स्पष्ट होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!